परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
Cross references
देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले. देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन. रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का? कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो.
माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो तो माझा भक्म किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे.
परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.
चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.
असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
आणि त्यांनी विचारले, “यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हाणून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”
जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.