Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 147:18 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 147:18 · मराठी बायबल

नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात. बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते.

Cross references

ईयोब 6:16

वितळणाऱ्या बफर्ाने गच्च होतात व दुथडी भरुन वाहू लागतात तसे तुम्ही आहात.

ईयोब 37:10

देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते आणि समुद्र गोठतो.

ईयोब 37:17

परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत. तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो, तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.

स्तोत्रसंहिता 33:9

का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.

स्तोत्रसंहिता 78:26

देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.

स्तोत्रसंहिता 107:20

देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.

स्तोत्रसंहिता 147:15

देव पृथ्वीला आज्ञा करतो आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते.

Interlinear

Choose Theme