Home Bibles स्तोत्रसंहिता 145:9 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 145:9 · मराठी बायबल

परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.

Cross references

उत्पत्ति 9:10

तसेच तुमच्या सोबत जे पक्षी, गुरेढोरे, पशू आणि इतर जे प्राणी तारवातून बाहेर आले त्यांच्याशीही एक करार करतो म्हणजे सर्व सजीव सृष्टीशी मी करार करतो;

स्तोत्रसंहिता 25:8

परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो.

स्तोत्रसंहिता 36:6

परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.

स्तोत्रसंहिता 65:9

तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.

स्तोत्रसंहिता 86:5

प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.

स्तोत्रसंहिता 100:5

परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

स्तोत्रसंहिता 104:27

देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.

योना 4:11

तू एका वेलासाठी अस्वस्थ होऊ शकतोस तर मग निनवेसारख्या मोठ्या नगरीसाठी मला वाईट वाटणे अगदी शक्य आहे त्या नगरीत 1,20,000 पेक्षा जास्त लोक व खूप प्राणी आहेत. त्या लोकांना आपण चुकीचे वागत आहेत ह्याची जाणीव नव्हती.”

नहूम 1:7

परमेश्वर फार चांगला आहे. संकटसमयी तो सुरक्षित आश्रयस्थान आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो काळजी घेतो

मत्तय 5:45

जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो.

प्रेषितांचीं कृत्यें 14:17

परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्या द्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हांला आकाशातून पाऊस देतो.योग्य वेळी तो तुम्हांला चांगले पीक देतो. तो तुम्हांला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंत:करणे आनंदाने भरतो”

प्रेषितांचीं कृत्यें 17:25

हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे.

Interlinear

Choose Theme