Home Bibles स्तोत्रसंहिता 140:13 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 140:13 · मराठी बायबल

परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. चांगले लोक तुझी उपासना करतील.

Cross references

ईयोब 36:6

देव दुष्टांना जगू देणार नाही आणि तो गरीबांना नेहमीच न्यायाने वागवितो.

स्तोत्रसंहिता 11:7

परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात. चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.

स्तोत्रसंहिता 16:11

तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.

स्तोत्रसंहिता 23:6

माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील. आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन.

स्तोत्रसंहिता 32:11

चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!

स्तोत्रसंहिता 35:10

माझी सर्व हाडे म्हणतील, “परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा, तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.”

स्तोत्रसंहिता 73:24

देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.

स्तोत्रसंहिता 97:12

चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या.

नीतिसूत्रे 22:23

परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.

यशया 3:10

सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. सत्कृत्यांचे फळ त्यांना मिळेल.

योहान 14:3

मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.

योहान 17:24

‘हे पित्या, जे लोक तू मला दिलेस, त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते. आणि त्यांनी माझे गौरव करावे, जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली, म्हणून जे गौरव तू मला दिलेस, तेच हे गौरव आहे.

1 थेस्सलनीकाकरांस 4:17

मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील. आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदासर्वकाळ राहू.

प्रकटीकरण 7:14

मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतलीआहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत.

प्रकटीकरण 21:24

राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील. आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडेआणतील.

Interlinear

Choose Theme