Home Bibles स्तोत्रसंहिता 139:7 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 139:7 · मराठी बायबल

मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.

Cross references

ईयोब 22:13

पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?

यिर्मया 23:23

हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी देव येथे आहे पण मीच देव दूरवरच्या स्थळीही असतो.”

यिर्मया 23:24

एखादा माणूस माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीलही, पण त्याला शोधणे मला अगदी सोपे आहे. का? कारण मी स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांमध्ये सगळीकडे आहे.” परमेश्वर असे म्हणाला.

योना 1:3

योनाला परमेश्वराची आज्ञा पाळायची नव्हती. म्हणून योनाने परमेश्वरापासून दूर पळून जाण्यची प्रयत्न केला. योना याफोला गेला. योनाला तार्शिस या खूप दूरच्या नगराला जाणारे गलबत सापडले. योनाने सफरीचे पैसे भरले व तो गलबतावर चढला. गलबतावरील लोकांबरोबर योनाला तार्शिसला जाण्याची इच्छा होती. त्याला परमेश्वरापासून दूर पळायचे होते.

योना 1:10

तो परमेश्वरापासून दूर पळत आहे, हेही योनाने त्या लोकांना सांगितले. हे कळताच ते अतिशय घाबरले. त्यांनी योनाला विचारले, “परमेश्वराविरूध्द तू कोणती भंयकर गोष्ट केलीस?

प्रेषितांचीं कृत्यें 5:9

पेत्र म्हणाला, “देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्यानवऱ्याने का ठरविले? ऐक! त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळच आहेत! (तुझ्या नवऱ्याला जसे नेले) तसेच ते तुलाही नेतील.”

Interlinear

Choose Theme