स्तोत्रसंहिता 136:20 · मराठी बायबल
देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Cross references
गणना 21:33
नंतर इस्राएल लोक बाशानच्या रस्त्याला लागले. बाशानचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला.
अनुवाद 3:1
“मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा एद्राई येथे बाशानचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी सामोरी आली.
अनुवाद 3:3
“आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यांचा असा समाचार घेतला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.