मी किती काळ जगणार आहे? परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात. त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस?
Cross references
“माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
माझे काय होईल? हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन? ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव तू आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरुन जाण्यासाठी निर्माण केलेस.
कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे होणार नाही. कोणीही थडगे चुकवू शकणार नाही.
आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
ते मोठ्या आवाजात म्हणाले, “पवित्र आणि सत्य प्रभु, कोठपर्यंत तू पृथ्वीवरील लोकांचा न्याय करणार नाहीस आणिआम्हाला ठार मारल्याबद्दल त्यांना शिक्षा करणार नाहीस?”