Home Bibles स्तोत्रसंहिता 119:78 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:78 · मराठी बायबल

तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.

Cross references

1 शमुवेल 24:10

मी तुमच्या केसाला धक्का लावणार नाही. आता तुम्हीच पाहा. आज गुहेत परमेश्वराने तुम्हाला माझ्या समक्ष आणले होते. पण मी तुमची गय केली. तुमचा वध केला नाही. ‘हे माझे धनी आहेत शौल हा परमेश्वराचा अभिषिक्त राजा आहे. त्याला मी धक्का लावणार नाही’ असे मी म्हणालो.

1 शमुवेल 24:17

तो पुढे म्हणाला, “तुझे खरे आहे. माझे चुकले. तू माझ्याशी नेहमी चांगलाच वागलास. पण मी मात्र वाईट वागलो.

1 शमुवेल 26:18

तो पुढे म्हणाला, “धनी, तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मी काय केले? माझा अपराध कोणता?

स्तोत्रसंहिता 1:2

चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.

स्तोत्रसंहिता 7:3

परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही. मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.

स्तोत्रसंहिता 25:3

एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगाबाज मात्र निराश होतील. त्यांना काहीही मिळणार नाही.

स्तोत्रसंहिता 35:7

मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

स्तोत्रसंहिता 35:26

माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.

स्तोत्रसंहिता 69:4

मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत. ते विनाकारण माझा तिरस्कार करतात. माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात. माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात. मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.

स्तोत्रसंहिता 109:3

लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत. ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.

स्तोत्रसंहिता 119:15

मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पध्दत आचरेन.

स्तोत्रसंहिता 119:21

परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.

स्तोत्रसंहिता 119:23

नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.

स्तोत्रसंहिता 119:51

तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.

स्तोत्रसंहिता 119:85

काही गार्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे.

स्तोत्रसंहिता 119:86

परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात. माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर.

यिर्मया 50:32

गर्विष्ठे बाबेल अडखळून पडेल आणि तिला उठायला कोणीही मदत करणार नाही. तिच्यातील गावांत मी आग लावीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकाला भस्मसात करील.”

योहान 15:25

परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’

1 पेत्र 2:20

कारण जर तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हांला मार मिळाला आणि तुम्हांला तो सहन करावा लागतो, तर ते देवासमोर मान्य आहे.

Interlinear

Choose Theme