Home Bibles स्तोत्रसंहिता 119:112 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:112 · मराठी बायबल

मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.

Cross references

यहोशवा 24:23

तेव्हा यहोशवाने त्यांना सांगितले, “तर मग तुमच्यापैकी कोणाजवळ खोटे दैवत असतील तर ते टाकून द्या. इस्राएलांच्याच परमेश्वर देवावर मनोभावे निष्ठा ठेवा.”

1 राजे 8:58

आम्ही त्याला अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे.

2 इतिहास 19:3

पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वराला अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.”

एज्रा 7:10

एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे सर्व वेळ मन:पूर्वक अध्ययन आणि पालन केले. त्याला (परमेश्वराचे) हे आदेश आणि नियम इस्राएल लोकांनी शिकवायचे होते, तसेच त्यांच्याकडून तसे आचरण करुन घ्यायचे होते.

स्तोत्रसंहिता 18:22

परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो. मी त्याचे नियम पाळतो.

स्तोत्रसंहिता 119:33

परमेश्वरा, मला तुझे नियम शिकव आणि मी त्यांचे पालन करीन.

स्तोत्रसंहिता 119:36

श्रीमंत कसे व्हायचे हे शिकवण्यापेक्षा मला तुझ्या कराराचा विचार करण्यासाठी मदत कर.

स्तोत्रसंहिता 119:44

परमेश्वरा, मी सदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन.

स्तोत्रसंहिता 141:4

माझ्यात वाईट गोष्टी करायची इच्छा उत्पन्न होऊ देऊ नकोस. वाईट लोक चुकीच्या गोष्टी करतात तेव्हा मला त्यांच्यात जाऊ देऊ नकोस. वाईट लोकांना ज्या गोष्टी करायला आवडते त्यात मला भाग घेऊ देऊ नकोस.

नीतिसूत्रे 2:2

ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर.

फिलिप्पैकरांस 2:13

कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.

1 पेत्र 1:13

म्हणून मानसिकदृष्ट्या सावध असा आणि पूर्णपणे आत्मसंयमन करा. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्यावर तुमची आशा केंद्रित करा.

प्रकटीकरण 2:10

जेदु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठीसैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मीतुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.

Interlinear

Choose Theme