तझे नियम चांगले आहेत. मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
Cross references
मग लोकांनी उत्तर दिले, “हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही.
स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले. पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
जो परमेश्वर देवाची सेवा करणार नाही त्याला ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष
मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वराला अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन:पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले.
“आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या मुलींची लग्ने होऊ देणार नाही तसेच त्यांच्या मुली आमच्या मुलांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.
देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन. मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
जर तुम्ही देवाला वचन दिले असेल तर ते पाळा. ती वचने पाळायला वेळ लावू नका. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जे देण्याचे वचन तुम्ही देवाला दिले होते ते त्याला द्या.
“जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर,असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे.
आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वत:ला प्रथम देवाला दिले. आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हांला दिले.