परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस. तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव. माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.
Cross references
तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
परमेश्वरा, मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. परंतु तुझा चांगुलपणा दाखवण्यासाठी तू मला त्याबद्दल क्षमा केलीस.
देवा, तू माझा खडक आहेस तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.
तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे. माझे ओठ तुझी स्तुती करतात.
परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.
मी खिन्न आणि दु:खी आहे देवा, मला वर उचल, मला वाचव.
देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर. आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल. आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.
परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. तू खरोखरच चांगला आहेस हे मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली: “पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की, पुत्र तुझे गौरव करील.
त्याने स्वत:ला नम्र केले. आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.