Home Bibles स्तोत्रसंहिता 108:5 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 108:5 · मराठी बायबल

देवा, स्वार्गाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.

Cross references

1 इतिहास 29:10

त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे:“हे परमेश्वर, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.

स्तोत्रसंहिता 8:1

परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे.

स्तोत्रसंहिता 21:13

हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.

स्तोत्रसंहिता 57:5

देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस आणि तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर पसरला आहे.

स्तोत्रसंहिता 57:11

देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे. त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.

स्तोत्रसंहिता 72:19

त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा. त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या. आमेन आमेन.

स्तोत्रसंहिता 148:13

परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.

यशया 6:3

ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.

मत्तय 6:9

म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी.‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.

मत्तय 6:13

आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’

Interlinear

Choose Theme