Home Bibles स्तोत्रसंहिता 108:13 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 108:13 · मराठी बायबल

फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो. देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.

Cross references

शास्ते 15:8

शमशोनने मग पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक जण ठार झाले. त्यानंतर शमशोन एटाम खडकांमधील गुहेत राहिला.

2 इतिहास 20:12

“देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करुन येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहोत.”

स्तोत्रसंहिता 18:29

परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.

स्तोत्रसंहिता 18:42

मी माझ्या शत्रूचे मारुन तुकडे केले. त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.

स्तोत्रसंहिता 60:12

फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो. 13

स्तोत्रसंहिता 118:6

परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 144:1

परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.

यशया 25:10

परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर असल्याने मवाबचा पराभव होईल. परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.

यशया 63:3

तो उत्तरतो, “मी स्वत:च द्राक्षकुंडावरून चाललो मला कोणी मदत केली नाही. मी रागावलो होतो आणि मी द्राक्षे तुडविली. तो रस माझ्या वस्त्रांवर उडाला. म्हणून माझी वस्त्रे आता मळीन झाली आहेत.

रोमकरांस 16:20

शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांबरोबर असो.

1 करिंथकरांस 15:10

पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.

2 करिंथकरांस 2:14

पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो.

इफिसकरांस 6:10

शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा.

Interlinear

Choose Theme