ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
Cross references
देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली. मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली.
मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले. ते देवाकडे धावत परतले.
पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
नंतर त्यांनी परमेश्वराला मदती साठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
“यहूदा, माझा धावा कर. मी ओ देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील.
लोक त्यांचा अपराध कबूल करेपर्यंत आणि माझा शोध घेईपर्यंत मी माझ्या जागी परत जाईन. हो! त्यांच्या अडचणीच्या वेळी ते माझी कसून शोध करतील.”