Home Bibles स्तोत्रसंहिता 107:12 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 107:12 · मराठी बायबल

त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.

Cross references

निर्गम 2:23

बऱ्याच वर्षानंतर मिसरचा राजा मरण पावला. अजूनही इस्राएल लोकानां अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व देवाने त्या ऐकल्या;

निर्गम 5:18

आता आपल्या कामावर माघारी जा. आम्ही तुम्हाला गवत देणार नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.”

शास्ते 10:16

मग इस्राएल लोकांनी त्या परक्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते पुन्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाहून परमेश्वराला त्यांची दया आली.

शास्ते 16:21

मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर घान्य दळायला लावले.

शास्ते 16:30

“या पलिष्टड्यांच्या बरोबरच माझीही अखेर होईल.” एवढे म्हणून त्याने जबरदस्त ताकद लावली. त्याबरोबर पूर्ण देऊळ जमीनदोस्त झाले. अधिकाऱ्यांसह सर्व माणसे त्याखाली सापडली. जिवंतपणी मारली त्यापेक्षा कितीतरीपट माणसे शमशोनने अशाप्रकारे मरता मरता मारली.

2 राजे 6:26

असे चाललेले असताना इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन चालला होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने हाक मारली आणि सांगितले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”

2 राजे 6:33

अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्या जवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहू?”

2 राजे 14:26

इस्राएलचे दास काय किंवा स्वतंत्र माणसे काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, हे परमेश्वराने पाहिले. यातला कोणीच इस्राएलला वर आणण्याच्या पात्रतेचा नाही हे त्याने ओळखले

नहेम्या 9:37

या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत.

ईयोब 9:13

देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा देवाला घाबरतात.”

स्तोत्रसंहिता 18:40

तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला.

स्तोत्रसंहिता 22:11

तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत आणि मला मदत करायला कोणीही नाही.

स्तोत्रसंहिता 142:4

मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत. पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही. मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.

यशया 51:19

दोन-दोनच्या गटाने यरूशलेमवर संकटे आली चोरी आणि नुकसान, भूक आणि युध्द.तू संकटात असताना तुला कोणीही मदत केली नाही. कोणी तुझ्यावर दया केली नाही.

यशया 51:23

आता तुला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मी माझा राग काढीन व त्यांना शिक्षा करीन. त्या लोकांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते तुला म्हणाले, ‘आमच्यापुढे वाक. आम्ही तुला तुडवून जाऊ.’ त्यांनी बळजबरीने तुला वाकविले आणि माती तुडवल्याप्रमाणे ते तुझ्या पाठीवरून चालले. तू जणू काही त्यांचा रस्ता होतीस.”

यशया 52:5

काय घडले आहे ते आता पाहा दुसऱ्या एका राष्ट्राने माझ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. माझ्या लोकांना गुलामाप्रमाणे ताब्यात घेणारे हे राष्ट्र कोणते? माझ्या लोकांना गुलाम म्हणून घेताना त्यांनी काहीही किंमत मोजली नाही. हे राष्ट्र माझ्या लोकांवर सत्ता गाजविते. त्यांची थट्टा करते. ते लोक नेहमीच माझी निंदा करतात.”

यशया 63:5

मी सभोवर पाहिले. पण मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मला मदत केली नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. म्हणून मी माझ्या लोकांना वाचविण्यासाठी माझे स्वत:चे सामर्थ्य वापरले. माझ्या स्वत:च्या रागाची मला मदत झाली.

विलापगीत 5:5

आमच्या मानेवर सक्तीने जोखड ठेवले जाते. आम्ही दमून जातो. पण आम्हाला विश्रांती नाही.

लूक 15:14

त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर, त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली.

Interlinear

Choose Theme