Home Bibles स्तोत्रसंहिता 106:42 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 106:42 · मराठी बायबल

देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.

Cross references

शास्ते 2:14

परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना.

शास्ते 4:3

सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.

शास्ते 10:12

सीदोनी, अमालेकी, मिद्यानी यांनीही तुम्हाला छळले तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. तेव्हा ही मी तुम्हाला वाचवले.

2 इतिहास 12:8

पण यरुशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.”

नहेम्या 9:28

मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली. तेव्हा तू शत्रू कडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकलास आणि त्यांच्या मदतीला गेलास किती बरे तू कनवाळू आहेस! असे अनेकदा घडले.

विलापगीत 1:16

“हग्र सगळयाबद्दल मी आक्रोश करते. माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. सांत्वन करायला माझ्याजवळ कोणी नाही. माझे दु:ख हलके करणारा कोणीही नाही. माझी मुले ओसाड भूमीप्रमाणे झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”

Interlinear

Choose Theme