समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान, तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.
Cross references
पाणी एक सारखे चढतच गेले आणि त्यामुळे तारु जमिनीपासून उंचावर तरंगू लागले;
“जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल; त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल. त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.”
जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे. ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
“ईयोब, तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?
समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.
काही लोक बोटीतून समुद्रापार जातात. त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
भूमी यापुढे मृतांना झाकून ठेवणार नाही. त्या वेळेला लिव्याथान ह्या कपटी सर्पाचा परमेश्वर न्यायनिवाडा करील. वेटोळे घालून बसलेल्या लिव्याथान सर्पाला परमेश्वर आपल्या मोठ्या, कठीण व बलवान तलवारीने शिक्षा करील. समुद्रातील प्रचंड धुडाला तो मारील.
गबालची वडील व कुशाल माणसे तुझ्या जहाजावर डांबराने भेगा बुजविण्यासाठी होते. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे नावाडी व्यवसायासाठी तुझ्याकडे येत आणि तुझ्याशी व्यापार करीत.’