का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस. तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
Cross references
परमेश्वरच काहीना दरिद्री तर काहींना श्रीमंत करतो. काही लोकांना लाचार करतो तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”
मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.
तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले. मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस. त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतातआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्याढगासारखे आहे.
म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे. मला माझे मन रिकाम करु दे. जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे. खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस. खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे.
देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो. आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.
परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
आता यरुशलेम म्हणते, “मी परमेश्वराचे ऐकण्याचे नाकारले. म्हणून परमेश्वर जे करीत आहे. ते योग्यच होय. तेव्हा सर्व लोकांनो, ऐका! माझ्या यातना पाहा! माझे तरुण तरुणी कैदी झाले आहेत.
एखाद्याच्या पापांबद्दल परमेश्वराने त्याला शिक्षा केल्यास तो माणूस तक्रार करू शकत नाही.
आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आणि वाईट गोष्टी घडल्या.
“परमेश्वरा, आम्हा सर्वांना लाज वाटली पहिजे. आमच्या सर्व राजांनी नेत्यांनी आणि आमच्या पूर्वजांनी लाजेने मान खाली घातल्या पाहिजेत. का? कारण परमेश्वरा, त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले.
आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्र प्रमाणे सर्व दोषी आहेत.
छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही.