नीतिसूत्रे 8:32 · मराठी बायबल
“मुलांनो, आता माझे ऐका, जर तुम्ही माझा मार्ग अनुसरला तर तुम्हीही आनंदी व्हाल.
Cross references
2 शमुवेल 22:22
कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही आपराध मी केला नाही.
स्तोत्रसंहिता 1:1
1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावरविश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
स्तोत्रसंहिता 119:1
शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत. ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
स्तोत्रसंहिता 128:1
परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात.
नीतिसूत्रे 3:18
ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.
नीतिसूत्रे 5:7
मुलांनो, आता माझे ऐका. मी जे सांगतो ते विसरु नका.
नीतिसूत्रे 7:24
मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या.
लूक 11:28
परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”