माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव.
Cross references
म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
“याकोब (इस्राएल) त्याला सापडला वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात. परमेश्वराने त्याला आपल्या कवेत घेतले आणि डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळले.
तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.
तुझा करार नेहमीच चांगला असतो. तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.
आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाने, “मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ. म्हणजे तू जिवंत राहाशील.
या धड्यांची नेहमी आठवण ठेवा. हे धडे विसरु नका. ते तुमचे जीवन आहे.
मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दावीदबरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता.
पण यिर्मया म्हणाला, “सैनिक तुला त्या यहूदाच्या लोकांच्या स्वाधीन करणार नाहीत. राजा सिद्कीया, माझ्या सांगण्याप्रमाणे वागून परमेश्वराची आज्ञा पाळ. मग तुझ्यासाठी सर्व सुरळीत होईल आणि तुझा जीवही वाचेल.
का? कारण जर त्यांनी तुला दुखविले तर ते (कृत्य) देवाच्या डोळ्यातील बुबुळाला इजा करण्यासारखेच आहे.
कारण मी स्वत:हून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले, त्यानेच मला आज्ञा केली आहे.
ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वत:ला त्याच्यासाठी प्रगट करीन.”
मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात.
जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की, आम्ही देवाला खऱ्या अर्थानेओळखले आहे.
प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीतिकरतो तो त्याच्या मुलावरही प्रीति करतो.
“जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्कराहील.