नीतिसूत्रे 5:5 · मराठी बायबल
तिचे पाय मृत्यूलाच जाऊन भिडतात. ती तुला सरळ कबरेत नेईल.
Cross references
नीतिसूत्रे 2:18
तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल.
नीतिसूत्रे 6:20
माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
नीतिसूत्रे 7:1
मुला, माझे शब्द लक्षात ठेव. मी देतो त्या आज्ञा विसरु नकोस.
नीतिसूत्रे 7:27
तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो.
उपदेशक 7:26
मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.