Home Bibles ☰ Books नीतिसूत्रे 4:6 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 4:6 · मराठी बायबल

ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.”

Cross references

नीतिसूत्रे 2:10

ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.

नीतिसूत्रे 2:11

ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल.

नीतिसूत्रे 3:21

मुला, तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. या गोष्टी सोडू नकोस.

नीतिसूत्रे 4:21

तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव.

इफिसकरांस 3:17

आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंत:करणात राहावा. व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतित मुळावलेली असावी.

2 थेस्सलनीकाकरांस 2:10

आणि जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्याविरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता फसवणूक व्हावी म्हणून तो आणील, कारण त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले. यासाठी की त्यांचे तारण होणे शक्य व्हावे.

Interlinear

Choose Theme