Home Bibles नीतिसूत्रे 31:4 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 31:4 · मराठी बायबल

लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. मद्याची इच्छा धरणे हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते.

Cross references

लेवीय 10:9

“जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधि आहे.

1 राजे 16:9

जिम्री हा एला राजाचा अधिकाही होता. एलच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.

1 राजे 20:12

राजा बेन - हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.

1 राजे 20:16

राजा बेन - हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला.

एस्तेर 1:10

मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मन: स्थितीत होता. तेव्हा आपल्या तैनातीत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस या सात खोजांना त्याने राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. राणी खूप सुंदर होती. तेव्हा आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिने आपले रुप दाखवावे अशी त्याची इच्छा होती.

एस्तेर 3:15

राजाच्या हुकूमानुसार सर्व तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र चिंत्ताक्रांत झाले.

नीतिसूत्रे 20:1

द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वत:वरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.

नीतिसूत्रे 23:34

तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल.

उपदेशक 10:17

पण राजा जर चांगल्या घराण्यातूनआलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.

यशया 5:22

मद्य पिण्यात त्यांची प्रसिध्दी आहे आणि मद्याचे मिश्रण करण्यात ते तरबेज आहेत.

यशया 28:7

पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात.

दानीएल 5:2

राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती.

होशेय 4:11

व्यभिचार, कडक पेय, व नवीन मद्य माणसाची सरळ विचार करण्याची ताकद नष्ट करतील.

होशेय 7:3

त्यांची दुष्कृत्ये त्यांत्या राजाला आनंद देतात. त्यांची दैवते त्यांच्या नेत्यांना खूश करतात.

हबक्कूक 2:5

देव म्हणाला, “मद्य माणसाला दगा देऊ शकते. त्याप्रमाणे बलवान माणसाचा गर्व त्याला मूर्ख बनवू शकतो. पण त्याला शांती मिळणार नाही. तो मृत्यूसारखा असतो त्याची आसक्ती वाढतच राहाते. आणि मृत्यूप्रमाणेच, त्याला कधीही समाधान मिळत नाही. तो इतर राष्ट्रांचा पराभव करीतच राहील. त्या राष्ट्रांतील लोकांना तो कैद करीतच राहील.

मार्क 6:21

मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली.

Interlinear

Choose Theme