नीतिसूत्रे 31:29 · मराठी बायबल
“चांगल्या स्त्रिया खूप आहेत. पण तू सर्वांत चांगली आहेस.”
Cross references
रूथ 3:11
तेव्हा आता घाबरू नकोस. तू म्हणशील तसे मी करतो. तू एक चांगली बाई आहेस हे गावातील लोकांना ठाऊक आहे.
नीतिसूत्रे 12:4
नवरा चांगल्या बायकोबद्दल आनंदी आणि अभिमानी असतो. पण जर बाई आपल्या नवऱ्याला लाज आणत असेल. तर ती त्याच्या शरीरातल्या आजारा सारखी असते.
गीतरत्न 6:8
तिथे कदचित 60 राण्या आणि 80 दासीअसतील आणि तरुण स्त्रिया अगणित असतील.
इफिसकरांस 5:27
यासाठी की, तो मंडळीला स्वत:साठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.