Home Bibles नीतिसूत्रे 31:16 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 31:16 · मराठी बायबल

ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.

Cross references

यहोशवा 15:18

अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?”

नीतिसूत्रे 14:1

शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते.

गीतरत्न 8:12

शलमोना, तू तुझे 1000 शेकेलठेवून प्रत्येकाला त्याने आणलेल्या द्राक्षाच्या मोबदल्यात 200 शेकेल दे. पण मी माझा स्वत:चा द्राक्षाचा मळा मात्र ठेवणार आहे.

मत्तय 13:44

“स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.

Interlinear

Choose Theme