Home Bibles नीतिसूत्रे 3:34 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 3:34 · मराठी बायबल

जर एखादा माणूस गर्विष्ठ असला आणि दुसऱ्यांची चेष्टा करत असला तर परमेश्वर त्याला शिक्षा करील आणि त्याची चेष्टा करील. पण परमेश्वर नम्र लोकांशी दयाळू असतो.

Cross references

स्तोत्रसंहिता 138:6

देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळड्यालोकांचा कैवारी आहे गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.

नीतिसूत्रे 1:26

म्हणून मी तुमच्या संकटांना हसेन. तुमच्यावर संकटे आलेली पाहून मला आनंद होईल.

नीतिसूत्रे 9:7

जर तुम्ही गर्विष्ठ माणसाला तो चुकत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावर केवळ टीका करेल. तो माणूस देवाच्या शहाणपणाची चेष्टा करतो. जर तुम्ही दुष्ट माणसाला तो चुकत आहे असे सांगितले तर तो तुमची चेष्टा करेल.

नीतिसूत्रे 9:12

जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण तर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता.

नीतिसूत्रे 19:29

जो माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याला इतर लोक शिक्षा करतील. मूर्ख माणसासाठी जी शिक्षा राखून ठेवली होती ती त्याला मिळेल.

नीतिसूत्रे 21:24

गर्विष्ठ माणसाला आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असे वाटत असते. तो वाईट आहे हे तो आपल्या करणीने दाखवतो.

यशया 57:15

देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.

याकोब 4:6

पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.”

1 पेत्र 5:5

त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, पण दीनावर कृपा करतो.” नीतिसूत्रे 3:34

Interlinear

Choose Theme