नीतिसूत्रे 3:22 · मराठी बायबल
ज्ञान आणि समज तुला जीवन देतील. आणि ते अधिक सुंदर करतील.
Cross references
नीतिसूत्रे 1:9
तुझ्या आईचे आणि वडिलांचे शब्द म्हणजे तुझे मस्तक सुशोभित करणारा फुलांचा मुकुट आहे. ते शब्द म्हणजे तुझ्या गळ्याभोवती असलेली सुंदर माळ आहे.
नीतिसूत्रे 4:22
जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत.
नीतिसूत्रे 19:8
जर एखाद्याचे स्वत:वर खूपच प्रेम असेल तर तो शहाणा होण्याचा प्रयत्न करील, तो समजून घेण्याचा खूप प्रयत्न करील आणि त्याला त्याचे बक्षिस मिळेल.
यशया 38:16
माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर. मला शुध्द व निरोगी व्हायला मदत कर. मला परत जिवंत कर.
योहान 12:49
कारण मी स्वत:हून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले, त्यानेच मला आज्ञा केली आहे.