Home Bibles नीतिसूत्रे 29:16 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 29:16 · मराठी बायबल

जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल.

Cross references

स्तोत्रसंहिता 37:34

परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा. त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.

स्तोत्रसंहिता 37:36

परंतु नंतर तो नाहीसा झाला, मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.

स्तोत्रसंहिता 58:10

वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली तर चांगल्या माणसाला आनंद होईल, तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.

स्तोत्रसंहिता 91:8

तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल.

स्तोत्रसंहिता 92:9

परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल.

स्तोत्रसंहिता 92:11

मी माझे शत्रू माझ्याभोवती बघतो. ते भल्या मोठ्या बैलाप्रमाणे माझ्यावर चालकरुन येण्याच्या तयारीत आहेत. ते माझ्याबद्दल काय बोलतात ते मी ऐकतो.

स्तोत्रसंहिता 112:8

ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.

नीतिसूत्रे 29:2

राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.

प्रकटीकरण 15:4

हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील. फक्त तूच पवित्र आहेस सर्व लोक येऊन तुझीउपासना करतील कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”

प्रकटीकरण 18:20

हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर! संतानो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो आनंद करा! तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविलेत्याबद्दल देवाने तिचा न्याय केला आहे.”

Interlinear

Choose Theme