जर तुम्ही एखाद्याला तो चुकतो आहे असे सांगून मदत केलीत तर तो नंतर तुमच्याबद्दल आनंदी होईल. लोकांबरोबर नेहमी गोडगोड बोलण्यापेक्षा हे खूप चांगले.
Cross references
तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तूच तो माणूस आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला. तुला शौलापासून वाचवले.
राजाच्या सेवकांनी त्याच्या आगमनाची राजाला वर्दी दिली. “तेव्हा नाथान राजाच्या समोर आला व खाली लवून अभिवादन केले.
मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा मुलगा बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.
मी इतर कुणाला वागवतो त्याप्रमाणे ईयोबला वागवले पाहिजे. मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही. मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन.
एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही. मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल.
चांगला माणूस माझ्या चुका दुरुस्त करु शकतो. तो त्याचा दयाळूपणाच होईल. तुझे भक्त माझ्यावर टीका करु शकतात. त्यांना करण्यासाठी ती चांगली गोष्ट असेल. मी ती स्वीकारीन परंतु वाईट लोक ज्या वाईटगोष्टी करतात त्याच्याविरुध्द मी नेहमी प्रार्थना करीन.
उघड टीका ही गुप्त प्रेमापेक्षा चांगली असते.
जर एखादा माणूस गोड बोलून आपले काम करुन घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो स्वत:साठीच सापळा तयार करीत असतो.
“जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्यांने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस.
पण, जेव्हा पेत्र अंत्युखियात आला तेव्हा मी त्याला उघडपणे विरोध केला, कारण त्याने स्पष्टपणे चूक केली होती.
आणि ही गोष्ट मनामध्ये ठेवा की, आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण, ज्याप्रमाणे आपला प्रिय बंधू पौल याला देवानेदिलेल्या शहाणपणामुळे त्याने तुम्हांला लिहिले.