Home Bibles नीतिसूत्रे 26:21 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 26:21 · मराठी बायबल

लोणारी कोळसा कोळश्याला पेटता ठेवतो आणि लाकूड शेकोटी पेटती ठेवते. त्याचप्रमाणे जे लोक संकटे निर्माण करतात तेच वाद चालू ठेवतात.

Cross references

2 शमुवेल 20:1

शबा नावाचा एक माणूस तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबी अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांना गोेळा केले आणि त्यांना म्हणाला,“दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही इस्राएलींनो, चला आपापल्या डेऱ्यात परत.”

1 राजे 12:20

यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांना कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्याला इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दावीदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.

स्तोत्रसंहिता 120:4

सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.

नीतिसूत्रे 10:12

मत्सरमुळे वादविवाद होतात. पण प्रेम लोकांनी केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला क्षमा करते.

नीतिसूत्रे 15:18

लवकर रागावणारे लोक संकटे आणतात. पण संयमी माणूस शांतता आणतो.

नीतिसूत्रे 29:22

रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो.

नीतिसूत्रे 30:33

जर एखादा माणूस दूध घुसळत असेल तर तो लोणी काढतो. जर एखाद्याने कुणाला नाकावर ठोसा मारला, तर त्यातून रक्त येईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही लोकांना राग येण्यासारखे काही केले तर तुम्ही संकटे निर्माण कराल.

Interlinear

Choose Theme