Home Bibles नीतिसूत्रे 25:23 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 25:23 · मराठी बायबल

उत्तरेकडून वाहणारा वारा पाऊस आणतो त्याचप्रमाणे चुगल्या राग आणतात.

Cross references

ईयोब 37:9

दक्षिणेकडून चक्रीवादळ येते. उत्तरेकडून थंड वारे येतात.

ईयोब 37:22

आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुनचमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते.

स्तोत्रसंहिता 15:3

तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वतच्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही. त्यांना त्रास होईल असे काही करत नाही. तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.

स्तोत्रसंहिता 101:5

जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.

नीतिसूत्रे 26:20

शेकोटीत जर लाकडे नसतील तर ती शेकोटी विझून जाते. त्याचप्रमाणे अफवा नसतील तर वाद संपून जातात.

रोमकरांस 1:30

ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच

2 करिंथकरांस 12:20

कारण मला भय वाटते की, मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही. आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हांस आढळेन. म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील.

Interlinear

Choose Theme