Home Bibles नीतिसूत्रे 24:8 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 24:8 · मराठी बायबल

जर तुम्ही नेहमी त्रास देण्याच्याच योजना आखत असाल तर लोकांना तुम्हीच त्रास देणारे आहात हे कळेल आणि ते तुमचे ऐकणार नाहीत.

Cross references

1 राजे 2:44

माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील.

स्तोत्रसंहिता 21:11

का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द वाईट गोष्टींची योजना आखली परंतु ते यशस्वी झाले नाहीत.

नीतिसूत्रे 6:14

तो माणूस दुष्ट असतो, तो नेहमी वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतो. तो सगळीकडे संकटे आणतो.

नीतिसूत्रे 6:18

ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.

नीतिसूत्रे 14:22

जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात.

नीतिसूत्रे 24:2

ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात.

नीतिसूत्रे 24:9

मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वत: ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात.

यशया 10:7

“पण मी अश्शूरचा उपयोग करून घेणार आहे हे त्याला कळत नाही. मी त्याचा साधन म्हणून उपयोग करीन असे त्याच्या लक्षात येत नाही. अश्शूरला फक्त इतर लोकांचा नाश करायचा आहे, खूप राष्ट्रांचा घात करण्याचा त्याचा बेत आहे.

यशया 32:7

तो मूर्ख दुष्टपणाचा उपयोग हत्यारासारखा करतो. गरीबांना लुबाडण्याच्या योजना तो करतो. तो गरीबांबद्दल खोटेनाटे सांगतो आणि ह्यामुळे गरीब न्यायापासून वंचित होतात.

यहेज्केल 38:10

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी तुझ्या मनात एक कल्पना येईल, तू एक दुष्ट बेत आखू लागशील.

नहूम 1:11

अश्शूर, तुझ्याकडून एक माणूस आला. त्याने परमेश्वराविरुध्द कट रचला. त्याने वाईट सल्ला दिला.

रोमकरांस 1:30

ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच

Interlinear

Choose Theme