जो नेहमी किंमतीचा विचार करणारा माणूस आहे. तो कदाचित् तुम्हाला म्हणेल, ‘खा आणि प्या’ पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही.
Cross references
तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.”
अबशालोम म्हणाला, “तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा.” राजा दावीद म्हणाला, “तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?”
लोक त्यांच्या शेजाऱ्यांशी खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याची खोटी स्तुती करुन त्याला चढवतो.
माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.
लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले.
दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते.
त्या दोन राजांनी एकमेकांना दुखविण्याचा चंगच बांधला असेल. ते एकाच टेबलावर बसून एकमेकांशी खोटे बोलतील. पण यातून कोणाचाच फायदा होणार नाही. का? कारण देवाने त्यांच्या शेवटाची वेळ निशिचत केली आहे.
नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे.”
ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वत:शी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!”
जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला.