Home Bibles नीतिसूत्रे 20:15 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 20:15 · मराठी बायबल

सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते.

Cross references

ईयोब 28:12

“पण माणसाला शहाणपण कुठे मिलेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?

ईयोब 28:18

शहाणपण पोवळ्यापेक्षा वा स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे. माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.

ईयोब 28:19

इथिओपियातले पीत स्फटिक शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत. शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.

नीतिसूत्रे 3:15

ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यावान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.

नीतिसूत्रे 5:2

नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील.

नीतिसूत्रे 8:10

माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे.

नीतिसूत्रे 8:11

ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे. ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.”

नीतिसूत्रे 10:20

चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात.

नीतिसूत्रे 15:7

शहाणे लोक बोलतात तेव्हा नवीन माहिती मिळते. पण मूर्ख लोक ऐकण्यासारखे काही बोलत नाहीत.

नीतिसूत्रे 15:23

चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो.

नीतिसूत्रे 16:16

ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.

नीतिसूत्रे 16:21

माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो.

नीतिसूत्रे 16:24

मायेच शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात.

नीतिसूत्रे 25:12

जर शहाण्या माणसाने तुम्हाला समज दिली असेल तर ती शुध्द सोन्याच्या अंगठ्यापेक्षा किंवा दागिन्यांपेक्षा अधिक किंमती असल.

उपदेशक 12:9

गूरू अतिशय शहाणे होते. त्यांनी त्यांचे शहाणपण लोकांना शिकवायला वापरले. गुरूनी शहाणपणाच्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांची नीट रचना केली.

रोमकरांस 10:14

परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील?

इफिसकरांस 4:29

तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल.

Interlinear

Choose Theme