Home Bibles नीतिसूत्रे 16:15 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 16:15 · मराठी बायबल

राजा जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवन सगळ्यांसाठी चांगले असते. राजा जर तुमच्यावर खुष असला तर ते वसंतात ढगातून पडणाऱ्या पावसासारखे असते.

Cross references

ईयोब 29:23

पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.

स्तोत्रसंहिता 4:6

बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”

स्तोत्रसंहिता 21:6

देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास. राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.

स्तोत्रसंहिता 30:5

देव रागावला होता म्हणून त्याचा निर्णय होता “मृत्यू.” परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो.

स्तोत्रसंहिता 72:6

राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.

नीतिसूत्रे 19:12

राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.

नीतिसूत्रे 29:26

खूप लोकांना राज्यकर्त्यांशी मैत्री करायची असते. पण फक्त परमेश्वरच लोकांना योग्य न्याय करतो.

होशेय 6:3

आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ या परमेश्वराला समजून घ्यायचा कसून प्रयत्न करू या. पहाट येते हे जसे आपल्याला माहीत आहे, हेही आपल्याला माहीत आहे. जमिनीला पाणी पुरविणाव्या वसंतातील पावसाप्रमाणे परमेश्वर येईल.”

जखऱ्या 10:1

वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.

प्रेषितांचीं कृत्यें 2:28

तू मला कसे जगायचे ते शिकविलेस. तू माइयाजवळ येशील. आणि मला मोठा आनंद देशील.’

Interlinear

Choose Theme