Home Bibles नीतिसूत्रे 12:27 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 12:27 · मराठी बायबल

आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टी मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते.

Cross references

स्तोत्रसंहिता 37:16

मूठभर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात.

नीतिसूत्रे 10:4

आळशी माणूस गरीब राहील. पण जो माणूस कष्ट करील तो श्रीमंत होईल.

नीतिसूत्रे 13:4

आळशी माणसाला गोष्टी हव्या असतात पण त्या त्याला कधीही मिळणार नाहीत. पणे ते खूप कष्ट करतात त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळतील.

नीतिसूत्रे 15:16

गरीब राहून परमेश्वराचा आदर करणे हे श्रीमंत होऊन खूप संकटे भोगण्यापेक्षा चांगले असते.

नीतिसूत्रे 16:8

योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे.

नीतिसूत्रे 23:2

जरी तुम्हाला खूप भूक लागलेली असली तरी कधीही जास्त खाऊ नका.

नीतिसूत्रे 26:14

आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.

नीतिसूत्रे 26:15

आळशी माणूस स्वत:चे अन्न उचलून तोंडात घालण्यातदेखील आळशीपणा करतो.

Interlinear

Choose Theme