Home Bibles नीतिसूत्रे 11:22 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 11:22 · मराठी बायबल

जर स्त्री सुंदर असून मूर्ख असली तर ते डुकराच्या नाकात सुंदर सोन्याची नथ असल्यासारखे असते.

Cross references

उत्पत्ति 24:47

मग मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस? तुझ्या बापाचे नाव काय?’ तिने उत्तर दिले, ‘नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या;’ तेव्हा मग मी तिला सोन्याची आंगठी आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडयादिल्या;

नीतिसूत्रे 7:10

ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले.

नीतिसूत्रे 9:13

मूर्ख माणूस हा कर्कश बोलणाऱ्या वाईट स्त्रीसारखा असतो. तिच्याजवळ ज्ञान नसते.

नीतिसूत्रे 12:4

नवरा चांगल्या बायकोबद्दल आनंदी आणि अभिमानी असतो. पण जर बाई आपल्या नवऱ्याला लाज आणत असेल. तर ती त्याच्या शरीरातल्या आजारा सारखी असते.

नीतिसूत्रे 31:30

मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल. पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशांसा केली पाहिजे.

यहेज्केल 16:15

देव म्हणाला, “पण तू आपल्या सौंदर्यावरच विश्वास ठेवायला सुरवात केलीस. तू तुझ्या चांगल्या नावाचा उपयोग करुन माझा विश्वासघात केलास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस. त्या सर्वांच्या तू स्वाधीन झालीस.

नहूम 3:4

हे सर्व निनवेमुळे झाले निनवे अतिशय हाव असलेल्या वेश्येप्रमाणे आहे तिला आणखी हवे होते तिने स्वत:ला पुष्कळ राष्ट्रांना विकळे आणि आपल्या जादने त्यांना गुलाम बनविले.

1 पेत्र 3:3

तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी.

2 पेत्र 2:22

त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितलेआहे: “आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा” आणि दुसऱ्या म्हणीत: “स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.”

Interlinear

Choose Theme