नीतिसूत्रे 11:15 · मराठी बायबल
जर तुम्ही दुसऱ्या माणसाचे कर्ज फेडण्याची हमी घेतलीत तर तुम्हाला त्या बद्दल पश्चात्ताप करावा लागेल. पण जर तुम्ही त्याला तसे व्यवहार करायला नकार दिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल.
Cross references
नीतिसूत्रे 6:1
मुला, दुसन्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का?
नीतिसूत्रे 17:18
केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल.
नीतिसूत्रे 20:16
तुम्ही जर दुसऱ्या माणसाच्या कर्जासाठी स्वत:ला जामीन ठेवलेत तर तुम्ही तुमचे कपडे सुध्दा घालवून बसाल.
नीतिसूत्रे 22:26
दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहाण्याचे वचन देऊ नका.