Home Bibles फिलिप्पैकरांस 3:16 · मराठी बायबल
फिलिप्पैकरांस 3:16 · मराठी बायबल

फक्त आपण ज्या सत्यापर्यंत पोहोंचलो त्याच्याच मागे चालत राहावे.

Cross references

रोमकरांस 12:16

एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करु नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा. स्वत:स शहाणे समजू नका.

रोमकरांस 15:5

आणि देव जो धीराचा आणि उतेजनाचा उगम आहे, तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे.

गलतीकरांस 5:7

तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला?

गलतीकरांस 6:16

तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दयाअसो.

इफिसकरांस 5:2

आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.

फिलिप्पैकरांस 1:27

पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात.

फिलिप्पैकरांस 2:2

तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की, तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा, आणि एकच उद्देश असू द्या.

फिलिप्पैकरांस 4:2

मी युवदीया आणि संतुखेला सुद्धा प्रभूमध्ये बहिणी या नात्याने एकच विचार करण्यासाठी उत्तेजन देत आहे.

कलस्सैकरांस 2:6

म्हणून ज्याप्रमाणे तुम्हांला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभु म्हणून मिळाला, तसे त्याच्यामध्ये एक होत चला.

इब्री लोकांस 10:38

परंतु माझा धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही.” हबक्कू 2:3-4

2 पेत्र 2:10

विशेषत: जे पापमयवासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोकगौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत.

प्रकटीकरण 2:4

“तरीही तुइयाविरुद्ध माझे म्हणणे आहे: तू तुझी पहिली प्रीति सोडली आहेस.

प्रकटीकरण 3:3

म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे आणि जे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे वागा. आणिपश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी एखाद्या चोरासारख येईन आणि तुम्हाला हे कळणार नाही की मीनेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन.

Interlinear

Choose Theme