तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा मानीत, परमेश्वर दाखवी तेथेच ते तळ देत आणि परमेश्वर जेव्हा हालण्यास आज्ञा देई तेव्हा लोक तळ हलवून ढगाच्या मागे जात. लोक लक्ष देऊन परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळीत.
Cross references
कारण तुझा बाप अब्राहाम याने माझ्या आज्ञा, नियम व कायदे पाळले आणि मी सांगितलेल्या गोष्टी केल्या.”
सर्व इस्राएल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते.
कधी कधी ढग पवित्र निवास मंडपावर बरेच दिवस राही तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून मुक्काम हलवीत नसत.
छावणी हलवण्याची इस्राएल लोकांची ही पहिलीच वेळ होती. परमेश्वराने त्यांना मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हे केले.
आजपर्यंत तुम्ही आपल्या इस्राएल बांधवांनाही पाठिंबा दिलात. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काटेकोरपणे पाळल्या आहेत.
माझ्या पवित्र वस्तूंची तुम्ही काळजी घेतली नाही. माझ्या पवित्र जागेची जबाबदारी तुम्ही परक्यांवर टाकली.”
सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “मी सांगतो त्या प्रमाणे जीवन जग. मी सांगितलेल्या गोष्टी कर. मग माझ्या मंदिराचा तूच मुख्य अधिकारी होशील. मंदिराच्या पटांगणाची तू निगा राखशील. येथे उभ्या असलेल्या देवदूतांप्रमाणे तुलाही माझ्या मंदिरात कोठेही वावरायला मोकळीक असेल.