लेवी लोकांनी स्नान केले व, आपले कपडे धुतले. तेव्हा अहरोनाने त्यांना ओवळणी च्या अर्पणाप्रमाणे परमेश्वराला अर्पिले, आणि त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करुन त्याने त्यांना शुद्ध केले.
Cross references
आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाला, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.
“इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील तेव्हा आता इतर इस्राएल लोकांना त्यांचे प्रथम जन्मलेले मुलगे मला द्यावे लागणार नाहीत.
त्यांना शुद्ध करण्यासाठी पापार्पणातील पवित्र पाणी त्यांच्यावर शिंपड म्हणजे त्या पाण्यामुळे ते शुद्ध होतील. मग त्यांनी आपल्या अंगावरील केस काढावेत आणि आपले कपडे धुवावेत; त्यामुळे ते शुद्ध होतील.
नंतर अहरोनाने त्यांना परमेश्वराला समर्पित करावे. अशा रितीने लेवी लोक पवित्र परमेश्वराची सेवा कराण्यास पात्र होतील.
“तेव्हा तू लेवी लोकांना शुद्ध कर आणि ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे परमेश्वराला त्यांना समर्पित कर. तू हे केल्यानंतर त्यांनी दर्शनमंडपात येऊन आपले काम करावे.
त्याने स्वत:ला तिसऱ्या दिवशी व नंतर सातव्या दिवशी खास पाण्याने धुवावे. जर त्याने असे केले नाही तर तो अशुद्धच राहील.
“नंतर शुद्ध माणसाने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध माणसाच्या अंगावर शिंपडावे. तो माणूस सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.