Home Bibles गणना 6:5 · मराठी बायबल
गणना 6:5 · मराठी बायबल

स्वत:ला वेगळे केलेल्या त्या काळात नाजीराने आपले केस कापू नयेत. त्याच्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे. त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत; ते केस त्याने देवाला केलेल्या विशेष नवसाची खूण आहे. स्वत:ला वाहवून घेतलेल्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत.

Cross references

शास्ते 13:5

कारण तू गर्भवती राहून पुत्राला जन्म देशील. तो परमेश्वराचा असेल. तो नाजीर होईल. त्यांचे जावळ काढू नको. जन्माला येण्याअगोदर पासूनच परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी असेल. पलिष्ट्यांपासून तो इस्राएलांचे रक्षण करील.”

शास्ते 16:17

शेवटी त्याने तिला सर्व काही सांगून टाकले. तो म्हणाला, “आजतागायत कधीही माझे केस कापलेले नाहीत. माझ्या जन्माआधीच मला परमेश्वराला वाहिलेले आहे. तेव्हा आता माझे मुंडन केले तर माझा शक्तिपात होईल व मी चार चौघांसारखा सामान्य होईन.”

शास्ते 16:19

आपल्या मांडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले. त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले. अशारितीने तिने त्याला अगदी हतबल करुन टाकले. शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला. त्याची शक्ती त्याला सोडून गेली.

1 शमुवेल 1:11

परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”

विलापगीत 4:7

यहुदातील काही लोकांनी एका विशेष प्रकारे आपले जीवन देवाला वाहिले होते. ते फार शुध्द होते. ते हिमापेक्षा शुभ्र होते. दुधापेक्षा पांढरे होते. त्यांची कांती पोवळयांप्रमाणे लाल होती. त्यांच्या दाढ्या म्हणजे जणू काही तेजस्वी इंद्रनीलच.

1 करिंथकरांस 11:10

यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.

Interlinear

Choose Theme