Cross references
गणना 32:34
गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
यशया 15:2
राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे.
यिर्मया 48:18
“दोबोनच्या रहिवाशांनो, आपापल्या मानाच्या जागा खाली करा. जमिनीवर धुळीत बसा. का? कारण मवाबचा विनाश करणारा येत आहे, आणि तो तुमची मजबूत शहेर नष्ट करील.
यिर्मया 48:22
दीबोन, नबे, बेथ-दिबलाथाईम ह्याही शहरांचा निवाडा झाला आहे.
यहेज्केल 6:14
पण मी माझा हात उगारीन व तुला आणि तुझ्या लोकांना शिक्षा करीन. मी मग ते लोक कुठेंही राहात असोत, ह्या देशांचा नाश करीन. तो मग दिबला वाळवंटा पेक्षा ओसाड होईल. तेव्हाच त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळून येईल.”