Home Bibles गणना 32:27 · मराठी बायबल
गणना 32:27 · मराठी बायबल

पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.”

Cross references

गणना 11:28

तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, “मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला.” (यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.)

गणना 12:11

म्हणून अहरोन मोशेला विनंती करुन म्हणाला, “माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा.

गणना 32:17

त्यामुळे आमची मुले या ठिकाणी राहाणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलच्या इतर लोकांना मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.

गणना 36:2

ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला चिठ्या टाकून आमची जमीन घेण्याची आज्ञा केली आहे. आणि परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता.

यहोशवा 4:12

रऊबेनी, गादी आणि मनश्शाचा अर्धा वंशातील लोक मोशेच्या सांगण्याप्रमाणे हत्यारबंद होऊन, नदी ओलांडून इतरांच्यापुढे गेले. परमेश्वराने द्यायचा कबूल केलेला प्रदेश मिळवून द्यायला ते उर्वरित इर्साएल लोकांना मदत करणार होते.

2 करिंथकरांस 10:4

ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात.

इफिसकरांस 6:10

शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा.

2 तीमथ्थाला 4:7

मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे.

Interlinear

Choose Theme