Home Bibles गणना 31:7 · मराठी बायबल
गणना 31:7 · मराठी बायबल

लोक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर लढले. त्यांनी सर्व मिद्यानी पुरुषांना मारले.

Cross references

अनुवाद 20:13

आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना ठार करा.

शास्ते 6:1

नंतर पुन्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराने निषिध्द म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्यांना सलग सात वर्षे ठेवले.

शास्ते 6:33

मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर लोक एकत्र येऊन इस्राएल लोकांविरुध्द लढण्यास सज्ज झाले. यार्देन पलीकडे जाऊन त्यांनी एज्रीलच्या खोऱ्यात तळ दिला.

शास्ते 21:11

हे तुम्ही केलेच पाहिजे. त्यांच्यातील कोणीही पुरुष शिल्लक राहता कामा नये आणि अविवाहित कुमारिका वगळता सर्व स्त्रियांनाही ठार करा.” सैनिकांनी या आदेशाची अमलबजावणी केली.

1 शमुवेल 27:9

त्या भागातील सर्वांना दावीदाने नेस्तनाबूत केले. त्यांची मेंढरे, गाई गुरे, गाढवे, उंट, कापड चोपड लूटून आखीशच्या स्वाधीने केले. पण त्याने या लोकांपैकी कोणालाही जिवंत ठेवले नाही.

1 राजे 11:15

त्याचे असे झाले दावीदाने पूर्वी अदोमचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दावीदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. त्याने सर्वांची कत्तल केली होती.

Interlinear

Choose Theme