तेव्हा मोशे लोकांशी बोलला. तो म्हणाला, “तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा. परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्याचा सूड घेण्यासाठी करील.
Cross references
तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांना निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात धरून मी टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”
आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासानावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यान्पिढ्या युध्द होईल.”
तुम्ही माझा करार मोडला म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन; तुमच्यावर सैन्ये चालून येतील असे मी करीन; सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या नगरात जाल पण तेव्हा मी तुमच्यावर मरीचा रोग पसरवीन; तुमचे शत्रु तुमचा पराभव करतील.
“माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही.
तो करार हा आहे: तो आणि त्याच्या नंतरचे त्याचे वंशज याजक होतील. कारण आपल्या देवाबद्दलच्या त्याच्या भावना खूप तीव्र होत्या. आणि त्याने ज्या गोष्टी केल्या त्यामुळे इस्राएलचे लोक शुद्ध झाले.
इस्राएलचे लोक युध्दाला तयार झालेते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले. परमेश्वराचा धन्यवाद करा.
परमेश्वराच्या दूताने सांगितले, “मेरोज शहराला, त्यातील रहिवाश्यांना शाप द्या, ते सैनिकांबरोबर परमेश्वराच्या मदतीला धावून आले नाहीत.”
तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे.
परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.
“पण त्या वेळी, आमच्या प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचाच जय होईल. तो त्यांना योग्य ती शिक्षा करील. परमेश्वराच्या शत्रूंना योग्य अशीच शिक्षा मिळेल. सर्वनाश होईपर्यंत तलवार वार करील. तलवारीला लागलेली रक्ताची तहान भागेपर्यंत ती लोकांना ठार करील. आमच्या प्रभूला, सर्वशक्तिमान परमेश्वराला बळी मिळावा म्हणून असे घडेल. हा बळी म्हणजे फरात नदीच्या काठी उत्तरेच्या प्रदेशात असलेले मिसरचे सैन्य होय.
लोक बाबेलमधून बाहेर धावत आहेत. ते त्या देशातून सुटका करुन घेत आहेत. ते सियोनला येत आहेत. परमेश्वराच्या कृत्याबद्दल ते प्रत्येकाला सांगत आहेत. बाबेलला योग्य अशी शिक्षा परमेश्वर करीत असल्याबद्दल ते सांगत आहेत. बाबेलने परमेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले म्हणून आता परमेश्वर बाबेलचा नाश करीत आहे.