परमेश्वराने सांगितलेले मोशेने ऐकले व त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने ती चांदी-ते पैसे-अहरोन व त्याच्या मुलांना दिले.
Cross references
तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या.
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.
व ती अहरोन व त्याच्या मुलांना दे. इस्राएल लोकांनी सोडविलेल्या दोनशें त्र्याहत्तर प्रथम जन्मलेल्या लोकांनी दिलेले ते सोडवणुकीचे पैसे होत.”
म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वराला म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्या कडून काहीही घेतले नाही-साधा गाढव देखील नाही! परमेश्वरा, त्यांची अर्पणे स्विकारु नकोस.”
हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा बैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करीन.”
“मोशेचे नियमशास्त्र लक्षात ठेवा आणि पाळा. मोशे माझा सेवक होता. होरेब (सिनाय) पर्वतावर मी त्याला विधिनियम सांगितले. ते सर्व इस्राएली लोकांसाठी होते.”
मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही.
जर इतरही तुमच्यापासून ऐहिक गोष्टींची कापणी करण्याच्या या अधिकारात सहभागी होत असतील तर तसे करण्याचे आम्हालाही यापेक्षा अधिक मोठे कारण नाही काय? परंतु आम्ही हा अधिकार बजावला नाही. त्याऐवजी ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या मार्गात अडथळ येऊ नये म्हणून आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा. व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हांला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करु नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा.