Home Bibles गणना 3:13 · मराठी बायबल
गणना 3:13 · मराठी बायबल

“जेव्हा तुम्ही मिसर देशात होता तेव्हा त्या मिसरच्या लोकांचे प्रथम जन्मलेले मुलगे मी मारुन टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी घेतले. ते माझेच आहेत. परंतु तुमची प्रथम जन्मलेली मुले तुमचीच राहातील व फकत लेवी माझे होतील. मी परमेश्वर आहे.”

Cross references

निर्गम 12:29

मध्यरात्री परमेश्वराने मिसरमधील सर्व प्रथम जन्मलेले मुलगे. म्हणजे मिसरदेशाचा राजा फारो याच्या थोरल्या मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या थोरल्या मुलापर्यत सर्व मुलांना तसेच पशूंच्या प्रथम जन्मलेल्या सर्व नरांना मारून टाकले.

निर्गम 13:2

“इस्राएलाचा प्रत्येक प्रथम जन्मलेला म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आलेला मुलगा, त्याच प्रमाणे पशूतला प्रथम जन्मलेला नर ह्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. ते माझे आहेत.”

निर्गम 13:12

तुम्ही परमेश्वराला तुमचा प्रथम जन्मलेला मुलगा व पशूंमधील प्रथम जन्मलेला नर देण्याची आठवण ठेवलीच पाहिजे.

निर्गम 13:15

मिसरचा राजा फारो ह्याने आम्हांस मिसर सोडून जाऊ देण्याचे नाकारले; परंतु परमेश्वराने मिसरमधील प्रथम जन्मलेली मुले व पशुमधील प्रथम जन्मलेले नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही पशूमधील प्रथम जन्मलेले नर परमेश्वराला देऊन टाकतो आणि प्रथम जन्मलेली मुले आम्ही परमेश्वराकडून सोडवून घेतो.’

निर्गम 22:29

“हंगामाच्या वेळी तुमच्या पहिल्या धान्यातून काही व फळफळांचा काही रस मला दान करावा, हंगामाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत थांबू नये.“तू तुझा प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा;

निर्गम 34:19

“स्त्रीपासून जन्मलेला प्रथम पुत्र माझा आहे; तसेच तुमच्या गुराढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नर माझे आहेत.

लेवीय 27:26

“लोकांना गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.

गणना 3:41

आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले मुलगे व पुरुष घेणार नाही, त्या ऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”

गणना 8:16

इस्राएल लोकांनी लेवी लोक मला द्यावेत. ते माझे होतील. पूर्वी मी प्रत्येक इस्राएलास सांगितले होते की प्रत्येक घरातून प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा. परंतु आता इतर इस्राएलातील प्रथम जन्मलेल्या मुलांच्या ऐवजी मी लेवी लोक घेत आहे.

गणना 18:6

इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी लोकांना निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांना मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शन मंडपात काम करतील.

गणना 18:15

“स्त्रिचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वराला अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.

गणना 33:4

मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.

यहेज्केल 44:30

प्रत्येक पिकाच्या बहराचा पहिला भाग याजकाचा असेल. मळलेल्या पिठाचा पहिला भागसुद्धा तुम्ही याजकाला द्यावा. त्यामुळे तुमच्या घराला आशिर्वाद मिळतील.

लूक 2:23

ज्याप्रमाणे प्रभूच्या नियमात लिहिले आहे;“प्रत्येक प्रथम जन्मलेला तर प्रभूला अर्पण करावा.”

इब्री लोकांस 12:23

आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत अशांकडे आला आहात, आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश आहे त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात.

Interlinear

Choose Theme