Home Bibles गणना 25:18 · मराठी बायबल
गणना 25:18 · मराठी बायबल

तू त्यांना ठार मारले पाहिजेस. त्यांनी अगोदरच तुम्हाला त्यांचे शत्रू केले आहे त्यांनी तुला पिओर येथे फसवले आहे. आणि त्यांनी तुला कजबीच्या बाबतीतही नीचपणाने फसवले. ती मिद्यानच्या पुढाऱ्याची मुलगी होती. पण इस्राएल लोकांमध्ये आजार पसरला तेव्हा ती मारली गेली. बआल पौर या खोट्या देवतेची लोकांना फसवून उपासना करायला लावली म्हणून तो आजार इस्राएल लोकांमध्ये पसरला होता.”

Cross references

उत्पत्ति 3:13

मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?”ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”

उत्पत्ति 26:10

अबीमलेख म्हणाला, “तू आम्हाशी असे वागून ही वाईट गोष्ट केलीस; कारण आमच्या लोकातून कोणीही तुझ्या बायको बरोबर निजला असता आणि त्यामुळे त्याच्या माथी मोठे पाप लागून तो अपराधी ठरला असता.”

निर्गम 32:21

मोशे अहरोनास म्हणाला, “ह्या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?”

निर्गम 32:35

लोकांनीच आपल्यासाठी अहरोनाला सोन्याचे वासरु बनवावयास सांगितले म्हणून परमेश्वराने लोकांवर भयंकर रोगराई आणली.

गणना 31:15

मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले?

1 राजे 11:18

1मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्रवस्त्राची सोय केली.

2 करिंथकरांस 11:3

पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल.

2 पेत्र 2:14

त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडेकामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापातओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.

2 पेत्र 2:18

ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या सांगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागलेआहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात.

प्रकटीकरण 2:14

“तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात.बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणिमूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले.

Interlinear

Choose Theme