गणना 24:21 · मराठी बायबल
नंतर बलामने केनी लोकांना पाहिले आणि तो म्हणाला:“उंच पर्वतावर असलेल्या पक्षाच्या घरट्याप्रमाणेतुमचा प्रदेश सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटते.”
Cross references
उत्पत्ति 15:19
केनी, कनिजी, कदमोनी,
शास्ते 1:16
केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर (म्हणजेच यरीहो) सोडले. ते यहूदा लोकांना सामील झाले. ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांबरोबर राहू लागले. अराद नगराजवळ नेगेबमध्थे हे ठिकाण आहे. (केनी हे मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते.)
ईयोब 29:18
“मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत:च्या घरातच मृत्यू येईल.